नाटकाच्या पुस्तकानं प्रयोगाहून वेगळं काही साधायचं असतं, हे पुस्तक ते साधेल…
‘परफेक्ट मिसमॅच’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक. अर्थातच नाटक लिहिताना, व्यावसायिक नाटक लिहिण्याचा संकल्प सोडला आणि नाटक लिहिलं असं झालं नाही. माझी लेखनाची प्रक्रिया इतर नाटकांसारखीच होती. हे नाटक लिहून मात्र अत्यंत झपाट्यानं झालं. नाटकाच्या पुस्तकानं प्रयोगाहून वेगळं काही साधायचं असतं, त्यानं वाचनानुभवही द्यायचा असतो. हे पुस्तक ते साधेल अशी आशा बाळगतो.......